इस्लामपुरात रविवारी असंघटित कामगारांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:22 IST2021-01-14T04:22:26+5:302021-01-14T04:22:26+5:30

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार संघटना व जयंत द्रारिद्र्य निर्मूलन अभियानच्या वतीने रविवार, १७ जानेवारीला कामगार मेळावा आयोजित ...

A rally of unorganized workers on Sunday in Islampur | इस्लामपुरात रविवारी असंघटित कामगारांचा मेळावा

इस्लामपुरात रविवारी असंघटित कामगारांचा मेळावा

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार संघटना व जयंत द्रारिद्र्य निर्मूलन अभियानच्या वतीने रविवार, १७ जानेवारीला कामगार मेळावा आयोजित केला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक, युवा नेते प्रतीक पाटील, पुणे विभागाचे अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव (सांगली) उपस्थित राहणार आहेत.

इस्लामपूर, आष्टासह वाळवा तालुक्यातील कामगारांना सुरक्षा संच वाटप, कोरोना योद्ध्यांचा सन्मान, आरोग्य तपासणी अहवाल वितरण व योजनांची माहिती पत्रके वाटप, असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष व संघटनेचे मार्गदर्शक सुभाषराव सूर्यवंशी यांनी दिली.

राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील मंत्री कॉलनीमधील डायमंड हॉलमध्ये सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राजारामबापू उद्योग समूहातील आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: A rally of unorganized workers on Sunday in Islampur