वाळव्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST2021-02-17T04:32:54+5:302021-02-17T04:32:54+5:30

वाळवा : जनमानसांत वाहतूक नियमांची जनजागृती व्हावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपविभागीय परिवहन अधिकारी ...

Rally under the National Road Safety Campaign in the desert | वाळव्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रॅली

वाळव्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रॅली

वाळवा : जनमानसांत वाहतूक नियमांची जनजागृती व्हावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपविभागीय परिवहन अधिकारी विलास कांबळे, हुतात्मा संकुलाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत विविध उपकम राबविण्यात आले. यानिमित्ताने रॅलीचे आयाेजन करऱ्यात आले हाेते.

हुतात्मा किसन अहिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जिजामाता विद्यालय व क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा नायकवडी ॲकॅडमीमध्ये चित्रकला, निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य स्पर्धा व वाहतूक नियमांची परीक्षा पार पडली.

तसेच पोलीस विभाग, परिवहन विभाग, आर.एस.पी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर वायदंडे, जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके, पर्यवेक्षक सुरेश खणदाळे, उपविभागीय परिवहनचे सहायक निरीक्षक किरण चौधरी, नेहा बारपटे, तसेच जिल्हा समादेशक अनिल शेजाळे, आर. एस. पी अधिकारी सागर चिखले, राजकुमार भोसले यांच्या उपस्थितीत जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस हुतात्माचे प्रमुख मार्गदर्शक वैभव नायकवडी यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Rally under the National Road Safety Campaign in the desert