आष्ट्यात वृक्षारोपण करून रक्षाविसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST2021-09-16T04:32:25+5:302021-09-16T04:32:25+5:30
फोटो : आष्टा येथे रामचंद्र भुजुगडे यांच्या रक्षा कुटुंबियांनी नदीत विसर्जित न करता वृक्षारोपण केले. यावेळी रणजित तांबवेकर, नितीन ...

आष्ट्यात वृक्षारोपण करून रक्षाविसर्जन
फोटो : आष्टा येथे रामचंद्र भुजुगडे यांच्या रक्षा कुटुंबियांनी नदीत विसर्जित न करता वृक्षारोपण केले. यावेळी रणजित तांबवेकर, नितीन झंवर, सर्जेराव तांबेकर, संभाजी माळी, दिनेश जाधव, सचिन दमामे, अमोल देशिंगे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क,
आष्टा : येथील सामाजिक कार्यकर्ते व कस्तुरी फाैंड्रीमधील हरहुन्नरी मशीन शॉप विभागप्रमुख रामचंद्र भुजुगडे यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या रक्षा नदीत विसर्जित न करता वृक्षारोपण करून भुजुगडे कुटुंबियांनी समाजापुढे आदर्श घालून दिला आहे.
भुजुगडे कुटुंबीयांनी नेहमीच्या परंपरेला फाटा देऊन रक्षा नदीत न सोडता स्मशानभूमीत वृक्षारोपण करून त्याठिकाणी रक्षा विसर्जन केले. रामचंद्र भुजुगडे यांची आठवण म्हणून या झाडाचे भुजुगडे कुटुंबीय संगोपन करणार आहे
यावेळी उद्योजक नितीन झंवर, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक वीराज शिंदे, माणिक शेळके, जगन्नाथ बसुगडे, अर्जुन माने, मयूर धनवडे, गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सर्जेराव तांबवेकर, अंकुश मदने, संभाजी माळी, सचिन दमामे, राजाराम मोहिते, दीपक पाटील, अमोल देशिंगे आदी उपस्थित होते. यावेळी अमोल देशिंगे, वीराज शिंदे, संदीप तांबवेकर यांनी रामचंद्र भुजुगडे यांना आदरांजली वाहिली