आष्ट्यात जायंट्स सहेलीकडून पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:28 IST2021-08-23T04:28:57+5:302021-08-23T04:28:57+5:30
आष्टा : येथील जायंट्स ग्रुप ऑफ आष्टा सहेलीच्या वतीने आष्टा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून ...

आष्ट्यात जायंट्स सहेलीकडून पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन
आष्टा : येथील जायंट्स ग्रुप ऑफ आष्टा सहेलीच्या वतीने आष्टा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जायंट्स ग्रुप फेडरेशनच्या डॉ. सोनाली कुरणे, कमल उंटवाल, जायंट्स ग्रुप सहेलीच्या अध्यक्षा स्नेहा लिमये, जयश्री माने व आष्टा जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष समीर गायकवाड यांच्यासह पोलीस निरीक्षक अजित सिद, सहायक निरीक्षक मनोज सुतार, उदय देसाई, संजय सनदी, दीपक सदामते व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : २२ आष्टा १
ओळ : आष्टा येथे जायंट्स सहेलीच्या डॉ. सोनाली कुरणे, स्नेहा लिमये, जयश्री माने, कमल उंटवाल यांनी पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.