रक्षाबंधन जाती-धर्माचे ‘बंध’ नसलेला सण : राजपूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:30 IST2021-08-24T04:30:49+5:302021-08-24T04:30:49+5:30
सांगली : रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या पवित्र नात्यातील गोडवा, जिव्हाळा जपण्याबरोबरच राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवतो. कोणत्याही जाती-धर्माचे बंधन आड ...

रक्षाबंधन जाती-धर्माचे ‘बंध’ नसलेला सण : राजपूत
सांगली : रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या पवित्र नात्यातील गोडवा, जिव्हाळा जपण्याबरोबरच राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवतो. कोणत्याही जाती-धर्माचे बंधन आड न येता हा धागा नाती टिकविण्याबरोबरच सलोखाही निर्माण करताे, असे मत राजपूत शैक्षणिक संकुलाचे कुटुंबप्रमुख प्राचार्य एम. एस. राजपूत यांनी व्यक्त केले.
राजपूत शैक्षणिक संकुलाच्यावतीने आयोजित महारक्षाबंधन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी बहीण-भावांनी रक्षाबंधनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची जाेपासना केली. बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधून आपले कर्तव्य पार पाडले; तर बहिणींच्या संरक्षणाबरोबरच भेट वस्तू देऊन भावांनी आपली जबाबदारी पार पाडली. यावेळी प्रा. डी. एस. बिराजदार, प्रा. प्रशांत चव्हाण, अमृता चाौगुले, प्रियंका पाटील, संध्याराणी चाौपडे, चैत्राली शिंगणापूरकर, सागर कांबळे, तुषार बनसाेडे उपस्थित होते. प्रा. डी.जी. बरगे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. प्रा. महावीर तेरदाळे यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया वाले यांनी आभार मानले.