कोरोना योद्ध्यांसोबत रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:30 IST2021-08-24T04:30:25+5:302021-08-24T04:30:25+5:30
सांगली : मिरजेतील आदर्श शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या अक्षदा गुजर या चिमुकलीने कोरोना योद्ध्यासोबत रक्षाबंधन सण साजरा केला. महापालिकेचे ...

कोरोना योद्ध्यांसोबत रक्षाबंधन
सांगली : मिरजेतील आदर्श शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या अक्षदा गुजर या चिमुकलीने कोरोना योद्ध्यासोबत रक्षाबंधन सण साजरा केला. महापालिकेचे आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे यांना तिने राखी बांधली. कोरोनाच्या काळात आरोग्य विभागासह शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे तिने कोरोना योद्ध्याला राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले.
------
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्षाबंधन
सांगली शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अग्निशमन जवानांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. अध्यक्षा अनिता पांगम यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा ज्योती आदाटे, शहर जिल्हा सरचिटणीस प्रियांका तुपलोंढे, सेवादल अध्यक्षा आयेशा शेख, दिव्यांग सेल अध्यक्षा आशा पाटील, राणी कामटे, सांगली शहर उपाध्यक्षा सुधा कटारे उपस्थित होत्या.
----------