वाटेगावात वृक्षाराेपण करुन बाबासाहेब पाटील यांचे रक्षाविसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST2021-07-28T04:27:33+5:302021-07-28T04:27:33+5:30
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब पाटील यांचे रविवारी निधन झाले. रक्षाविसर्जनावेळी सामाजिक बांधिलकी जपत रक्षा ...

वाटेगावात वृक्षाराेपण करुन बाबासाहेब पाटील यांचे रक्षाविसर्जन
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब पाटील यांचे रविवारी निधन झाले. रक्षाविसर्जनावेळी सामाजिक बांधिलकी जपत रक्षा पाण्यात विसर्जित न करता झाडे लावून त्या झाडाखाली सर्व रक्षा विसर्जित करून पाटील कुटुंबीयांनी श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब पाटील यांच्या निधनाने वाटेगाव परिसरातील मार्गदर्शक, समाज सेवक हरपल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. रक्षाविसर्जनास माजी आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती रवींद्र बर्डे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, वाळवा तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे विजय लोहार, आर. बी. पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, अरूण बर्डे, अशिष जाधव यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी विविध संस्था, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : २७ वाटेगाव १
वाटेगाव येथे ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब पाटील यांच्या रक्षाविसर्जनावेळी झाडे लावून रक्षाविसर्जन करण्यात आले.