येडेमच्छिंद्र येथे उद्या राजू शेट्टी यांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:22 IST2020-12-25T04:22:17+5:302020-12-25T04:22:17+5:30

शिरटे : कृषी सुधारणा कायद्याविरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांची येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे शनिवार, दिनांक २६ रोजी सायंकाळी ...

Raju Shetty's meeting at Yedemachhindra tomorrow | येडेमच्छिंद्र येथे उद्या राजू शेट्टी यांची सभा

येडेमच्छिंद्र येथे उद्या राजू शेट्टी यांची सभा

शिरटे : कृषी सुधारणा कायद्याविरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांची येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे शनिवार, दिनांक २६ रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा आयोजित केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिली.

खराडे व जाधव म्हणाले की, गेल्या २६ दिवसांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. कृषी सुधारणेच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या माथी मारले जाणारे कायदे कसे घातक आहेत, याबाबत या सभेत विवेचन केले जाणार आहे. या सभेस राज्य प्रवक्ते अ‍ॅड. एस. यु. संदे, युवा आघाडीचे संजय बेले, पोपट मोरे, प्रकाश देसाई, जगन्नाथ भोसले, संतोष शेळके, शिवाजी मोरे उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Raju Shetty's meeting at Yedemachhindra tomorrow