शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

राजू शेट्टींनी आंदोलन करण्यापेक्षा साखर विकत घ्यावी-सुभाष देशमुख यांची खोचक टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 21:52 IST

एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे आंदोलन करत आहेत. साखरेला बाजारपेठेत उठावच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर पडून आहे. शेट्टींनी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली

ठळक मुद्देकारखानदारांचा फॉर्म्युला ‘स्वाभिमानी’ला मान्य नसल्यामुळेच उसाची बिले लांबली

सांगली : एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे आंदोलन करत आहेत. साखरेला बाजारपेठेत उठावच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर पडून आहे. शेट्टींनी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी आता शिल्लक राहिलेली साखर विकत घ्यावी आणि शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळवून द्यावी, अशी खोचक टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शेट्टी यांच्यावर शुक्रवारी सांगलीत केली. कारखानदारांना मी तसे आवाहन केल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

साखर कारखाने सुरू होऊन तीन महिन्यांचा काळ उलटला तरी शेतकºयांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. कारखानदारांनी काढलेला ७०:३० हा फॉर्म्युला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही. संघटनेने एकरकमी एफआरपीसाठी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची भूमिका घेतली आहे, आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. यावर पत्रकारांनी सहकारमंत्री देशमुख यांना विचारले असता ते बोलत होते. त्यांच्याहस्ते सांगलीमध्ये महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या बेघर निवारा केंद्राचे उद्घाटन झाले.

ते पुढे म्हणाले, एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. साखरेला बाजारपेठेत उठावच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर शिल्लक आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. राजू शेट्टींनी मध्यंतरी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी आता शिल्लक राहिलेली साखर विकत घ्यावी आणि शेतकºयांना एकरकमी एफआरपी मिळवून द्यावी. राज्यातील साखर कारखानदारांना आवाहन करतो की, त्यांनी राजू शेट्टी यांना साखर विकत द्यावी आणि एफआरपीचा तोडगा काढावा. शेतकºयांना वेळेत उसाची बिले मिळावीत, हीच सरकारची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने अधिकाºयांशी माझी सारखी चर्चा सुरु आहे. साखर कारखानदारांशी चर्चा केली असता, ते साखरेला दर नसल्याचे सांगत आहेत. शासनाकडून काही मदत करुन एफआरपीची रक्कम देण्याच्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत, असेही सुभाष देशमुख म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शेट्टी म्हणत आहेत की सहकार मंत्र्यांच्याच कारखान्याची एफआरपी थकीत आहे. पण शेतकºयांना १०० टक्के एफआरपीची रक्कम मिळणार आहे हे निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.भाजप-सेना युती होणारचलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजपनेही निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत आमची युती होणारच आहे, त्यात काही शंका नाही. काही नेत्यांचे मतभेद हे होत असतात. यावर मार्ग काढून नेत्यांचे मतभेद मिटवून तोडगा काढून युती होईलच, असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारणSugar factoryसाखर कारखाने