शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाच्या आखाड्यात शत्रूचा शत्रू तोच आपला दोस्त; राजू शेट्टींचा फंडा, मातोश्रीवरील भेटीने चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 16:23 IST

जाहीरनाम्याचा पंचनामा अन् नवा डाव..

अशोक पाटीलइस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून २०२४ च्या मैदानात एकला चलोची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सुरुवातीला घेतली होती. मात्र, अचानक त्यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांच्याशी खलबते केली. या भेटीने आगामी लोकसभेसाठी शत्रूचा शत्रू तो आपला दोस्त असा राजकीय फंडा घेऊन शेट्टी यांनी नवीन डाव टाकल्याची चर्चा आहे.एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी आपला वाढदिवस जोरदार साजरा करून हातकणंगलेतून आपली उमेदवारीच जाहीर केली. त्यामुळे भाजप नेत्यांच्यात अस्वस्थता वाढली आहे. तरीसुध्दा भाजपकडून उमेदवारीची चाचपणी केली जात आहे. महायुतीमध्ये ही खलबते सुरू असताना राजू शेट्टी यांनी अचानक मातोश्री गाठल्याने पुन्हा राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

सुरुवातीला राजू शेट्टी यांनी स्वबळाचा नारा पुकारला होता. मात्र, मातोश्रीच्या भेटीवर त्यांनी वेगळी प्रतिक्रिया देऊन या भेटीला वेगळे वळण दिले. तरीही हातकणंगले मतदार संघात उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेची ताकद आजही आहे, हे नाकारता येणार नाही. सध्या ठाकरे गट इंडिया आघाडीत सामील आहे. शरद पवार प्रणित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही या आघाडीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचाही आपण पाठिंबा मिळवू शकतो, असा डाव शेट्टींच्या मातोश्रीवरील भेटीमागील आहे. हा नवीन डाव लपून राहणारा नाही.

जाहीरनाम्याचा पंचनामा अन् नवा डाव..राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडीत चर्चेला उधाण आले. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशिल माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील निधीचा जाहीरनामाच प्रसिद्ध केला. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक लक्ष्य ठेवून आहेत. तर राजू शेट्टी यांनीही माने यांनी दिलेल्या निधीचा पंचनामा केला आहे. एकंदरीत या मतदार संघात माने आणि शेट्टी यांच्यातच लढत होणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय शत्रू असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जावून नवीन डाव टाकला आहे.

पाटगाव (जि. कोल्हापूर) येथील अदानी उद्योगसमूहाने वीजनिर्मितीसाठी कोकणात पाणी जाऊन वाया जाणार आहे. त्यामुळेच इचलकरंजी शहराला पिण्याच्या पाण्याचा फटका बसणार आहे. यासाठी या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी राजू शेट्टी मातोश्रीवर गेले होते. लोकसभेपर्यंत अजून बरेच पाणी पुलाखालून जाणार आहे. - भागवत जाधव, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीlok sabhaलोकसभा