अभयनगरच्या आरोग्य केंद्र राजमाता जिजाऊ जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:44+5:302021-01-13T05:09:44+5:30

संजयनगर : सांगली शहरातील अभयनगर येथील आरोग्य केंद्रामध्ये मंगळवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी ...

Rajmata Jijau Jayanti Celebration at Abhaynagar Health Center | अभयनगरच्या आरोग्य केंद्र राजमाता जिजाऊ जयंती साजरी

अभयनगरच्या आरोग्य केंद्र राजमाता जिजाऊ जयंती साजरी

संजयनगर : सांगली शहरातील अभयनगर येथील आरोग्य केंद्रामध्ये मंगळवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

डॉ. संजीवनी घाटगे म्हणाल्या, राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा. महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य अतिशय मोलाचे आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार राजमाता जिजाऊ यांनी मिळवून दिला. जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून बदलत्या आव्हानाला महिलांनी सामोरे जावे.

यावेळी उज्ज्वला कांबळे, सपना ऐवळे, हेमा राजेशिर्के, सविता सुतार, अमृता शिंदे, आदी उपस्थित होते.

..........................

फोटो ओळी : अभयनगर येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी केली. यावेळी डॉ. संजीवनी घाटगे, उज्ज्वला कांबळे, सपना ऐवळे, आदी उपस्थित होते.

Web Title: Rajmata Jijau Jayanti Celebration at Abhaynagar Health Center