राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कारांचे आज वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:24 IST2021-03-14T04:24:35+5:302021-03-14T04:24:35+5:30
आदर्श आई पुरस्कारासाठी देवयानी देशमुख (कडेपूर), शहाजादबी पीरजादे (कामेरी), इंदू सावंत (सावंतपूर), शांताबाई खरमाटे (वंजारवाडी), मंगल शिंदे (पोसेवाडी), आक्का ...

राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कारांचे आज वितरण
आदर्श आई पुरस्कारासाठी देवयानी देशमुख (कडेपूर), शहाजादबी पीरजादे (कामेरी), इंदू सावंत (सावंतपूर), शांताबाई खरमाटे (वंजारवाडी), मंगल शिंदे (पोसेवाडी), आक्का पाटील (मणदूर), पार्वती कुंभार (हरीपूर), छबू चोथे ( करगणी), सुमन पाटील (सांगली), नीलिमा पाटील (मिरज), गुजव्वा नाटेकर (उमदी) व बायनाबाई साबळे (नांगोळे ) यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी आमदार सुमन पाटील, अनिल बाबर, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनाही आमंत्रित केले आहे. राम मंदिर चौकातील कच्छी भवनमध्ये दुपारी अडीच वाजता कार्यक्रम होईल.
दरम्यान, विठ्ठल पाटील यांचा नागरी सत्कारही जुनी धामणी येथे आयोजित केला आहे. पटोले व आठवले यांच्यासह ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सकाळी सत्कार कार्यक्रम होईल.