कवठे एकंदच्या सरपंचपदी राजेंद्र शिरोटे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST2021-02-10T04:26:34+5:302021-02-10T04:26:34+5:30
कवठेएकंद : कवठेएकंद, ता. तासगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र शिरोटे तर उपसरपंचपदी भाजपच्या शर्मिला घाईल यांची ...

कवठे एकंदच्या सरपंचपदी राजेंद्र शिरोटे बिनविरोध
कवठेएकंद : कवठेएकंद, ता. तासगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र शिरोटे तर उपसरपंचपदी भाजपच्या शर्मिला घाईल यांची बिनविरोध निवड झाली.
शेतकरी कामगार पक्ष व भाजपच्या ‘कवठेएकंद ग्रामविकास पॅनेलने’ निवडणुकीमध्ये १७ पैकी १३ जागा मिळवून वर्चस्व सिद्ध केले. शेतकरी कामगार पक्षाकडे सरपंचपद पहिली अडीच वर्षे राहणार आहे. भाजपकडे उपसरपंचपद आहे. सरपंच, उपसरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी पी.के. सुतार होते.
सरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचे सत्कार करण्यात आले.
या वेळी ग्रामविकास अधिकारी पी. टी. जाधव, तलाठी सचिन इंगोले, शंकरराव माळी, पंचायत समिती सदस्य संतोष आठवले, बाबूराव लगारे, बाळासाहेब शिरोटे, दीपक घोरपडे, बाळासाहेब पवार, दीपक पाटील, संजय पाटील, विठ्ठल कुंभार आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांच्या हस्ते शिवछत्रपती महाराजांचा अभिषेक करून चित्रफितीचे अनावरण करण्यात आले.
चौकट
जल्लोषी मिरवणूक
फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत उत्साही कार्यकर्त्यांनी गावातून जल्लोषी मिरवणूक काढली. ठिकठिकाणी नवनिर्वाचितांचे स्वागत करण्यात येत होते.