म्हैसाळच्या पाण्यामुळे राजारामबापूंचे स्वप्न स्वप्न पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:25 IST2021-05-17T04:25:24+5:302021-05-17T04:25:24+5:30
उमदी (ता. जत) येथे बंदिस्त पाईपलाईनद्वारे म्हैसाळचे पाणी आले असून पाणी आले आहे. या पाण्याचे पूजन ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर, ...

म्हैसाळच्या पाण्यामुळे राजारामबापूंचे स्वप्न स्वप्न पूर्ण
उमदी (ता. जत) येथे बंदिस्त पाईपलाईनद्वारे म्हैसाळचे पाणी आले असून पाणी आले आहे. या पाण्याचे पूजन ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष फिरोजभाई मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ॲड. होर्तीकर म्हणाले की, जत पूर्व भागातील उर्वरित ४२ गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करावा व उमदी परिसरात म्हैसाळचे पाणी सोडावे, अशी अनके वर्षांची मागणी होती. जयंत पाटील यांनी जलसंपदा खाते आपल्याकडे घेतले व गेल्या अनेक वर्षाचा वनवास संपविला आहे.
यावेळी इस्माईल सय्यद, धानय्या हिरेमठ, राजू पाटील, उपसरपंच बाबू नागौड, शिवलिंग पाटील, राजू मकानदार, चिदानंद रगटे, आर.डी. सातपुते, पिंटू शिंदे, सोना सय्यद, योगेश वाघदरी, जमीर कलाल आदी उपस्थित होते.
चौकट
जलसंपदामंत्र्यांनी न्याय दिला
या अगोदर पाऊसाच्या पाण्याने ओव्हरफूल होऊन तुरची-बबलेश्वरचे पाणी आले. ते पाणी आम्हीच पाणी आणले आहे असे सांगून पूजन करणाऱ्यांना म्हैसाळचे पाणी आम्ही आणले असे सांगण्याचा नैतिक अधिकार आहे का? जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बंदिस्त पाईपलाईनद्वारे म्हैसाळचे पाणी सोडून खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. त्यामुळे जत तालुक्यातील जनता कदापिही हे उपकार विसरणार नाही अशी टीका फिरोजभाई मुल्ला यांनी केली.