राजारामबापू, वाटेगाव-सुरुलचा वजनकाटा अचूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:57+5:302021-02-05T07:27:57+5:30
इस्लामपूर : सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी गठीत केलेल्या वैधमापन विभागाच्या भरारी पथकाने राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे ...

राजारामबापू, वाटेगाव-सुरुलचा वजनकाटा अचूक
इस्लामपूर : सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी गठीत केलेल्या वैधमापन विभागाच्या भरारी पथकाने राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे व वाटेगाव-सुरुल शाखा कार्यस्थळावर अचानक भेट दिली. यावेळी वजन काट्यांची तपासणी केली. यात भरारी पथकाने सर्व वजन काटे अचूक असल्याचा लेखी अहवाल कारखाना व्यवस्थापनास दिला आहे.
नायब तहसीलदार सुनील ढाले, सांगलीचे लेखापरीक्षक राजेंद्र कुडचे, इस्लामपूरचे वैधमापन निरीक्षक वाय. एस. आगरवाल, सहायक पोलीस निरीक्षक गणेश भरते, पोलीस हवालदार जे. एन. मुलाणी, एम. एन. घस्ते, ए. ए. मुल्ला यांच्या भरारी पथकाने राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिटला आणि वाटेगाव सुरूल युनिटला मंगळवारी अचानक भेट दिली.
यावेळी त्यांनी कारखान्याच्या सर्व काट्यांची तपासणी केली. सर्व काटे अचूक असल्याचा अहवाल त्यांनी कारखाना व्यवस्थापनास दिला. यावेळी मुख्य अभियंता संताजी चव्हाण, विजय मोरे, रमेश बोराळकर, वैभव पाटील व कारखान्याचे अधिकारी, शेतकरी सभासद उपस्थित होते.