शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

अजामीनपात्र वॉरंट, राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याने आजच्या सुनावणीलाही गैरहजरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 11:52 IST

२००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर सन २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसे मार्फत महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

शिराळा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागणं झाल्यामुळे आज, दि.८ जून रोजी शिराळा न्यायालयात उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती त्यांचे वकील अॅड . रवी पाटील यांनी दिली. मनसेचे शिरीष पारकर व  जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना ही अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे .यातील मनसे नेते शिरीष पारकर हे  न्यायालयात हजर राहणार आहेत परंतु मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत हे काही कारणास्तव न्यायालयात हजर राहू शकणार नाहीत.असे ही त्यांनी सांगितले.न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यास वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच.एस. सातपुते यांनी २८ एप्रिल २०२२ रोजी अजामिनपात्र वारंट बजावले आहे. त्यामुळे या तिघांना बुधवार दि. ८ रोजी शिराळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.२००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर सन २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसे मार्फत महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता.यावेळी मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून तानाजी सावंतसह अन्य दहा जणांवर कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . यामध्ये आरोपी क्रमांक ९ म्हणून राज ठाकरे व तत्कालीन मनसेचे नेते शिरीष पारकर याना आरोपी क्रमांक दहा म्हणून सह आरोपी करण्यात आले होते .

टॅग्स :SangliसांगलीRaj Thackerayराज ठाकरेCourtन्यायालय