शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंनी भोंग्यापेक्षा पक्षवाढीकडे लक्ष द्यावे, रामदास आठवलेंनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 16:32 IST

राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक येतात, मात्र त्यांना मते देत नाहीत

सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक येतात, मात्र त्यांना मते देत नाहीत. त्यामुळे त्यांनी आता भोंग्याकडे लक्ष देण्याऐवजी पक्षवाढीकडे लक्ष द्यावे, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत लगावला.काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाईबाबत आठवले म्हणाले की, राहुल गांधी हे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळेच त्यांच्यावर न्यायालयाने कारवाई केली. त्यांचे सदस्यत्व गेले. या कारवाईमागे भाजपचा कोणताही हात नाही. कायदा समान असतो, राहुल गांधी हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत.ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे काम समाधानकारक आहे. शिंदेंनी उठाव केला आणि त्यांच्या मागे संपूर्ण शिवसेना उभी राहिली. त्यामुळेच त्यांना पक्षाचे चिन्ह मिळाले. आता उद्धव ठाकरे यांनी नवा पक्ष काढावा.सांगलीत विमानतळ हवेकवलापूर येथील नियोजित विमानतळासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करू. केंद्रीय नागरी विमान उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मी व खासदार संजय पाटील प्रश्न मांडू.शरद पवारांनी आमच्याकडे यावेआठवले म्हणाले, काँग्रेस आता खिळखिळी झाली आहे. नागालँडमध्ये रिपाइंला राष्ट्रवादीने साथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. त्यांनी आता ‘एनडीए’ला साथ द्यावी.

टॅग्स :SangliसांगलीRaj Thackerayराज ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवले