शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील काही भागात कोसळल्या पावसाच्या हलक्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 17:51 IST

सायंकाळच्या सुमारास सांगली परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्या. शिराळा तालुक्यात कोकरुड, चरण परिसरात रिमझिम पाऊस झाला. 

सांगली - दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने दक्षिणेकडील राज्यासह महाराष्ट्रात पुढील किमान चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही भागात पावसाने हजेरी देखील लावली आहे. यानंतर आज सायंकाळच्या सुमारास सांगली परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्या. शिराळा तालुक्यात कोकरुड, चरण परिसरात रिमझिम पाऊस झाला. 

बदलत्या वातावरणामुळे दुपारच्या सुमारास काहीशी गरमी जाणवत होती. नंतर मात्र काही भागात पावसाच्या रिमझीम सरी कोसळल्या. ऐन गुलाबी थंडीच्या महिन्यातच पावसाने हजेरी लावल्याने हवेतील गारवा नाहिसा झाला आहे. मात्र काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याने हवेत पुन्हा गारवा निर्माण होत आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांना सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी कधी थंडी त कधी गरमीचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये सर्दी, खोकला यासारख्या आजाराचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.

कोकणातील चिपळूण परिसरात आज दुपारीच मुसळधार पाऊस कोसळला. तर काल, शनिवारी कोल्हापूर शहरातही पावसाने हजेरी लावली होती. सध्या खरिपातील भाताची काढणी अंतिम टप्प्यात आली असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. मात्र, हा पाऊस रब्बी पिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.  

१४ ते १७ नोव्हेंबरपर्यंत मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली