जिल्ह्यात पावसाची अनेक ठिकाणी उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST2021-06-23T04:17:55+5:302021-06-23T04:17:55+5:30

सांगली शहर व परिसरात सोमवारी सकाळपासून ऊन-पावसाचा खेळ रंगला होता. दुसरीकडे धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही अत्यंत कमी झाला ...

Rainfall in many places in the district | जिल्ह्यात पावसाची अनेक ठिकाणी उघडीप

जिल्ह्यात पावसाची अनेक ठिकाणी उघडीप

सांगली शहर व परिसरात सोमवारी सकाळपासून ऊन-पावसाचा खेळ रंगला होता. दुसरीकडे धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही अत्यंत कमी झाला आहे. धरणातील विसर्ग सुरू असला तरी त्याचा नदीपातळीवरील परिणाम कमी आहे. सोमवारी सकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ११ फूट इतकी होती. येत्या दोन दिवसांत ती आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २५ जूनपर्यंत पावसाचा जोर कमीच राहणार आहेत. काही ठिकाणी तुरळक सरी, शिडकावा होण्याची शक्यता आहे.

चौकट

तापमानात पुन्हा वाढ

जिल्ह्यात मागील आठवड्यात सलग चार दिवस पडलेल्या पावसामुळे तापमानात घट झाली होती. आता तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. मंगळवारी कमाल तापमान ३१, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. कमाल तापमानात आणखी दोन अंशाने वाढ होण्याचा अंदाज आहे.

Web Title: Rainfall in many places in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.