जिल्ह्यात आठवड्यात पुन्हा पावसाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:16+5:302021-04-23T04:29:16+5:30

सांगली : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २७ व २८ एप्रिल रोजी जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची ...

Rainfall forecast for the week again in the district | जिल्ह्यात आठवड्यात पुन्हा पावसाचा अंदाज

जिल्ह्यात आठवड्यात पुन्हा पावसाचा अंदाज

सांगली : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २७ व २८ एप्रिल रोजी जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधित तापमानातही वाढ होणार आहे.

हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार आठवड्यात काही दिवस अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. दररोज सायंकाळी ढग दाटणार आहेत. २६ एप्रिल रोजी ढगांची दाटी वाढून विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या दिवशी पावसाची शक्यता नाही. त्यानंतर २७ व २८ एप्रिल रोजी सायंकाळी ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाची हजेरी लागणार आहे.

आठवडाभर तापमानातही वाढ होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी जिल्ह्याच्या किमान तापमानात अंशाने वाढ झाली. कमाल तापमान ३८.६, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आठवड्यात कमाल तापमान ४०, तर किमान तापमान २४ अंशापर्यंत वाढण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Rainfall forecast for the week again in the district