गव्हाण, वज्रचौंडे, अंजनीत मेघगर्जनेसह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:50+5:302021-05-30T04:22:50+5:30
गव्हाण : गव्हाण, वज्रचौंडे, अंजनी परिसरात (ता. तासगाव) शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सुमारे दीड तास ...

गव्हाण, वज्रचौंडे, अंजनीत मेघगर्जनेसह पाऊस
गव्हाण : गव्हाण, वज्रचौंडे, अंजनी परिसरात (ता. तासगाव)
शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.
सुमारे दीड तास अक्षरशः धो-धो पाऊस पडला. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. दोन-तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत होती. लोक उकाड्याने हैराण झाले होते. दुपारी चारच्या सुमारास वातावरण ढगाळ बनले. अखेर ढगांची दाटी होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पाऊस झाल्याने दिलासा मिळाला आहे. हा पाऊस खरीप हंगामासाठी लाभदायक आहे. या परिसरात सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, उडीद, मूग, चवळी, मका आदी पिकांचा हंगाम अगदी तोंडावर आला असल्याने शेतकरी पेरणीपूर्व मशागतीत गुंतला आहे. चालू वर्षी या परिसरात मशागतींना पूरक असे पाच ते सहा उन्हाळी पाऊस झाल्याने परिसरात पेरणीपूर्व मशागतींना वेग आला आहे.