शिराळा पश्चिम भागात दिवसभर वादळी वाऱ्यासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:25 IST2021-05-17T04:25:13+5:302021-05-17T04:25:13+5:30
कोकरुड : शिराळा पश्चिम आणि उत्तर भागात रविवारी सकाळपासून पाऊस कमी आणि सोसाट्याचा वारा मोठ्या प्रमाणात असल्याने घरावरील छत ...

शिराळा पश्चिम भागात दिवसभर वादळी वाऱ्यासह पाऊस
कोकरुड : शिराळा पश्चिम आणि उत्तर भागात रविवारी सकाळपासून पाऊस कमी आणि सोसाट्याचा वारा मोठ्या प्रमाणात असल्याने घरावरील छत उडून गेले तर झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. विजेच्या तारा तुटल्याने दिवसभर वीजसेवा खंडित करण्यात आली होती.
शिराळा पश्चिम आणि उत्तर भागात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारी पाऊस जास्त तर वारे कमी तर रविवारी याच्या उलट परिस्थिती होती. रविवारी सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र सोसाट्याचा वारा मोठा असल्याने चिंचोली येथील शिवाजी थोरात यांच्या घरावरील कौले तर गवळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचा पत्रा उडून गेल्याने नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा असल्याने तसेच वाऱ्याचा वेगही जादा असल्याने लोकांनी घराबाहेर पडणे टाळले.