शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आठवड्याच्या विश्रांतीनंतर सांगली जिल्ह्यात पावसाची हजेरी, पुढील चार दिवस पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 15:47 IST

शिराळा, वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला

सांगली : मागील आठवडाभर पावसाने उसंत घेतल्यानंतर जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल, बुधवारी पावसाने हजेरी लावली. शिराळा, वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तासगाव, खानापूर, जत तालुक्यातील काही गावात रिमझिम पावसाच्या सरी बसरल्या. हवामान विभागाने पुढील चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे.जुलैच्या पंधरवड्यात दमदार पाऊस बसरल्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर कमी झाला होता. दमदार पावसानंतर पेरण्यांना गती आली. पेरण्यायोग्य पावसानंतर जिल्ह्यात ९० टक्क्यांपर्यंत पेरण्या झाल्या. शेतीची अन्य कामेही जोमात सुरू होती. पावसाने उसंत घेतल्यानंतर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली.

दिवसभर ढगाळ वातावरण होते, सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. शिराळा, वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तासगाव, खानापूर, जत तालुक्यातील काही गावात रिमझिम पावसाच्या सरी बसरल्या. सांगली शहरातही सायंकाळी संततधार पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

अलमट्टीत ८८.२८ टक्के पाणीसाठा

अलमट्टी धरणाची पाणी साठवण क्षमता १२३.०१ टीएमसीची आहे. सध्या धरणात १०८.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण ८८.२८ टक्के भरले आहे. वारणा धरणात सकाळपर्यंत २६.८९ टीएमसी पाणीसाठा असून, या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. कोयना धरणात कोयना ६५.३६ टीएमसी पाणीसाठा असून धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस