खानापूर घाटमाथ्यावर गारांसह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST2021-04-30T04:34:37+5:302021-04-30T04:34:37+5:30

खानापूर : खानापूर घाटमाथ्यावर गुरुवारी दुपारी वळीव पावसाने गारांसह हजेरी लावली. तर काही गावांना वळीवाने पुन्हा हुलकावणी दिली. गेले ...

Rain with hail on Khanapur Ghat | खानापूर घाटमाथ्यावर गारांसह पाऊस

खानापूर घाटमाथ्यावर गारांसह पाऊस

खानापूर : खानापूर घाटमाथ्यावर गुरुवारी दुपारी वळीव पावसाने गारांसह हजेरी लावली. तर काही गावांना वळीवाने पुन्हा हुलकावणी दिली.

गेले दोन तीन दिवस खानापूर घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस पडला नाही. गुरुवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. ढगांच्या गडगडाटासह पावसास सुरुवात झाली.

खानापूर आणि खानापूरच्या उत्तर बाजूच्या मोही, शेडगेवाडी, भडकेवाडी, पोसेवाडी, अडसरवाडी परिसरात पावसाने सुमारे तासभर मध्यम स्वरुपात हजेरी लावली. पावसाबरोबर गाराही पडल्या. पोसेवाडी, अडसरवाडी परिसरात गारांचा मोठ्या प्रमाणात वर्षाव झाला. बेणापूर, सुलतानगादे, भिवघाट, हिवरे, करंजे येथे पावसाने हुलकावणी दिली. सायंकाळी सहानंतर पुन्हा वळीव पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. पावसामुळे रात्री हवेत गारवा निर्माण झाला होता.

Web Title: Rain with hail on Khanapur Ghat