शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 13:45 IST

शिराळा तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली

सांगली/कोकरुड : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह सांगली जिल्ह्याच्या काही भागांत मंगळवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. शिराळा तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने, विद्युत तारांचे नुकसान झाले. वाहतूकही विस्कळीत झाली.सांगली शहर, मिरज तालुक्याच्या पश्चिम भागासह शिराळा तालुक्यात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. सांगली शहरात दुपारी तीन वाजता पावसास सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. विद्युत तारा तुटल्याने तासभर विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली.शिराळा पश्चिम भागातील कोकरुड, येळापूर, मेणी, शेडगेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल वीस मिनिटे पडलेल्या पावसाचा पिकांच्या उगवणीस फायदा होणार आहे.                                   शिराळा पश्चिम भागातील मेणी-येळापूरसह गुढे-पाचगणी पठारावर धूळवाफ पद्धतीने ऐंशी टक्क्यांपर्यंत भात पिकाच्या पेरण्या उरकल्या आहेत. नदीकाठी साठ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरणी झालेले शेतकरी मान्सूनपूर्व पावसाच्या प्रतीक्षेत असताना, मंगळवारी पावणेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गारा पडल्या. तब्बल वीस मिनिटे पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.

बिळाशीत हलक्या सरीबिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) परिसरात दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अद्याप एकही वळीव पाऊस न पडल्यामुळे, शेतकरी धूळवाफेची पेरणी करण्यात गुंतला होता. आज दुपारी अचानक ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. उगवणी इतका पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पेरणी झालेल्या बियाला उगवणीसाठी अजून पाणी देणे गरजेचे आहे.

झाड कोसळल्याने वाहतूक ठप्पलक्ष्मीफाटा ते कवठेपिरान रस्त्यावर मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून रस्त्यावर पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली. दुचाकीस्वारांनी शेतातून वाहने ढकलत आणून गाव गाठले.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस