शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पोलिस खरे सांगताहेत की मध्य रेल्वे प्रशासन ?, सांगलीतील चिंतामणीनगर पुलाच्या मुदतवाढीचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 17:44 IST

सांगली : चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा गोंधळ अजून संपलेला नसताना त्याच्या मुदतवाढीवरूनही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आंदोलनाचा इशारा ...

सांगली : चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा गोंधळ अजून संपलेला नसताना त्याच्या मुदतवाढीवरूनही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आंदोलनाचा इशारा दिलेल्या सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांना मध्य रेल्वेने दिलेले पत्र व रेल्वे सुरक्षा दलाने दिलेली नोटीस यात पुलाचे काम पूर्ण होण्याच्या तारखा वेगवेगळ्या दिल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्याच या गोंधळावर समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सतीश साखळकर यांना रुळावर स्वातंत्र्य दिन साजरा न करण्यासाठी नोटीस बजावली आहे. या नोटिशीमध्ये चिंतामणीनगरचा उड्डाणपूल पूर्ण करण्यास १० सप्टेंबर २०२४ ची मुदत दिल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेच्या उपमुख्य अभियंत्यांनी साखळकर यांना एक पत्र देऊन पुलाच्या कामाबाबत काही स्पष्टीकरण दिले आहे. यात त्यांनी हा पूल ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे रेल्वेच्याच दोन वेगवेगळ्या विभागांनी दिलेल्या दोन वेगळ्या तारखांमुळे सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहेत.

तारीख पे तारीखचा खेळउड्डाणपुलाचे काम १० जून २०२३ पासून सुरू झाले होते. १० जानेवारी २०२४ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात जानेवारीची मुदत पुन्हा मार्चपर्यंत पुढे गेली. त्यानंतर वारंवार मुदतवाढ देत वर्ष उलटले. एक वर्षानंतरही काम पूर्ण न झाल्याने पुलाचे वर्षश्राद्ध घालण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी या पुलास १५ ऑगस्टची अंतिम मुदत दिली. आता रेल्वेने सप्टेंबरमधील दोन वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत.

खरे कोण अन् खोटे कोण?मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाचे पत्र व रेल्वे पोलिस दलाची नोटीस सोशल मीडियावर प्रसिद्ध करून सर्वपक्षीय समितीने यातील कोणती तारीख खरी आहे, असा सवाल उपस्थित केला. सोशल मीडियावर नागरिकांनी या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

किती दिवस नागरिकांचे हाल?सांगलीसह उत्तर बाजूस असलेले तालुके, प्रमुख गावांना या पुलाअभावी मोठा फटका बसला आहे. व्यापार, उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. नागरिक, विद्यार्थ्यांना पर्यायी मार्गाने जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. हे हाल आणखी किती दिवस राहणार, असा हताश सवालही सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे