रेल्वे आयसोलेशन बोगी सांगली स्थानकावर हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:04+5:302021-04-27T04:28:04+5:30

सांगली : सांगली शहरात एकही शासकीय व निमशासकीय कोविड सेंटर नाही. रेल्वे आयसोलेशन बोगी सांगली रेल्वे स्थानकावर आणून कोविड ...

Railway isolation bogie is required at Sangli station | रेल्वे आयसोलेशन बोगी सांगली स्थानकावर हवी

रेल्वे आयसोलेशन बोगी सांगली स्थानकावर हवी

सांगली : सांगली शहरात एकही शासकीय व निमशासकीय कोविड सेंटर नाही. रेल्वे आयसोलेशन बोगी सांगली रेल्वे स्थानकावर आणून कोविड रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी रुग्ण साहाय्य समितीचे सतीश साखळकर यांनी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

साखळकर म्हणाले की, पहिल्या लाटेवेळी सांगली सिव्हिल व महापालिकेचे आदिसागर कोविड सेंटर सुरू होते. त्यामुळे सांगलीतील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. यंदा सिव्हिलचे कोविड सेंटर सुरू झालेले नाही, तर आदिसागर कोविड सेंटर मिरजेतील तंत्रनिकेतनमध्ये सुरू केले आहे. वास्तविक मिरजेत शासकीय रुग्णालय, भारती हाॅस्पिटल, वालनेस हाॅस्पिटलसह विविध रुग्णालये आहेत. सांगली शहरात मात्र शासकीय व निमशासकीय कोविड रुग्णालये नाहीत. त्यामुळे शहरातील कोविड रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे. मध्य रेल्वे विभागाकडून रेल्वे आयसोलेशन बेडची बोगी तयार करण्याचे काम सुरू आहे. ही रेल्वे मिरजेऐवजी सांगली रेल्वे स्टेशनवर बोगी आणून कोविड सेंटर चालू करण्यात यावे, अशी मागणी आहे. या बाबतीत आपण सकारात्मक तत्काळ कार्यवाही कराल अशी आशा व्यक्त करतो.

Web Title: Railway isolation bogie is required at Sangli station