शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे महाव्यवस्थापक उतरले सांगलीच्या रुळावर; पादचारी पुलाच्या प्रश्नाची दखल, प्रश्न सुटण्याची आशा

By अविनाश कोळी | Updated: December 26, 2023 14:47 IST

पादचारी पूल नसल्यामुळे सांगली रेल्वे स्टेशनवरील प्रवासी व हमालांना रेल्वे रूळ ओलांडणे हाच एकमेव पर्याय आहे

सांगली : रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी नियोजित दौरा नसतानाही सांगलीच्या स्थानकाला भेट देत चक्क रुळावरुन चालत पाहणी केली. सांगली स्थानकावर प्रवासी व हमालांसाठी पादचारी पूल नसल्याने निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नाची दखल त्यांनी घेतली. आता हा प्रश्न त्यांच्यामार्फत सुटण्याची आशा येथील प्रवासी संघटनांना वाटत आहे.पाच हजार कोटीच्या पुणे-सांगली-लोंढा रेल्वे दुपदरीकरण व विद्युतीकरण प्रकल्पाअंतर्गत सांगली रेल्वे स्टेशनवर दोन प्रवासी गाड्यांचे व दोन मालगाड्यांचे प्लॅटफॉर्म असे एकूण चार नवे प्लॅटफॉर्म बाधण्यात आले आहेत. मात्र, सांगली रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म १, २ व ३ वरून या नवीन प्लॅटफॉर्म ४ व ५ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मपर्यंत व माल धक्क्यावर जाण्यासाठी पादचारी पुल बांधण्यात आलेला नाही.सांगली नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी माहिती अधिकारात रेल्वे प्रशासनाकडे याची विचारणा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नव्या प्लॅटफॉर्मसाठी पूल बांधण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. पादचारी पूल नसल्यामुळे सांगली रेल्वे स्टेशनवरील प्रवासी व हमालांना रेल्वे रूळ ओलांडणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे रोज सुमारे ३ हजार हमाल व ५ हजार प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.याच प्रश्नावर सध्या प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असताना रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी सांगलीला भेट देऊन रुळावरुन चालत पाहणी केली. आता तरी हा प्रश्न सुटणार का, असा सवाल नागरिक जागृती मंचने केला आहे.

नागरिक जागृती मंचचे सवालकमी उत्पन्न देणाऱ्या सातारा स्थानकावर नव्याने बांधलेल्या पाचही प्लॅटफॉर्मवर तसेच मालधक्क्यापर्यंत पादचारी पूल उभारुन त्याचे उद्घाटनही झाले, मग सांगलीच्या बाबतीतच हा दुजाभाव का? उत्पन्नात पुणे विभागात आघाडीवर असूनही किरकोळ सुविधांसाठी सांगली स्थानकास संघर्ष का करावा लागतो? रुळ ओलांडून प्रवासी व हमालांनी त्यांची सोय पहावी, असा रेल्वेचा नियम आहे का?

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे