शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'रेल्वे गाड्यांना उशीर चालेल, पण ट्रॅक सुरक्षितच हवा'; बालासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वे बोर्ड ॲक्शन मोडमध्ये

By संतोष भिसे | Updated: June 9, 2023 13:11 IST

अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

सांगली : बालासोर रेल्वेअपघातानंतररेल्वे बोर्ड ॲक्शन मोडमध्ये आले आहे. प्रत्येक विभागाला कृती आराखडा सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार पुणे रेल्वे प्रशासन २६ आठवड्यांचा कृती आराखडा तयार करीत आहे.रुळांच्या सुरक्षेविषयी कोणत्याही परिस्थितीत निष्काळजी न राहण्याच्या सूचना देशातील सर्वच विभागांना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही विभागाला ब्लॉक घेणे आवश्यक असेल तर त्यांना तो आपत्कालीन परिस्थितीनुसार देण्याची सूचना विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना देण्यात आली आहे. बालासोर रेल्वे अपघातानंतर पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूराणी दुबे यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या.गुरुवारी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंग यांनी सिग्नलिंग आणि टेलिकॉम, टीआरडी विभागाच्या अधिकाऱ्यांची व अभियंत्याची बैठक घेतली. कोणत्याही परिस्थितीत प्रवासी सुरक्षेला बाधा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. ऐनवेळी ब्लॉक घ्यावे लागले तरी चालेल, गाड्यांना थोडा उशीर झाला तरीही चालेल, पण प्रवासी सुरक्षितता महत्त्वाची आहे. कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा दिल्या जातील. कोणत्याही परिस्थितीत गाड्या मॅन्युअली जाणार नाहीत. इंटरलॉकिंगचे काम पूर्ण होईपर्यंत गाड्या धावणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले.

अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्दपुण्यासह अन्य विभागांतील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कार्यालयात बसून न राहता स्थानकात, यार्डामध्ये जाण्याची सूचनाही करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे विभागातील अधिकारी स्थानकामध्ये परीक्षण करताना दिसून येत आहेत. गुरुवारी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे रेल्वेत प्रवाशांची तिकिटे व सामान तपासात होते, तर सहायक परिचालन व्यवस्थापक सचिन पाटील यार्डात जाऊन मालगाडीला इंजिन व वॅगन जोडण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्नशील होते.

बालासोरसारखा अपघात पुणे विभागात व देशात पुन्हा होऊ नये यासाठी विविध पातळ्यांवर काम केले जात आहे. प्रवासी सुरक्षेशी कोणत्याही स्थितीत तडजोड केली जाणार नाही. अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यावर भर दिला जात आहे. - बी. के. सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेAccidentअपघात