तासगाव, मांजर्डेत दूध डेअऱ्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:23+5:302021-08-14T04:32:23+5:30
सांगली : अन्न व औषध प्रशासनाकडून तासगाव व मांजर्डे येथील दूध डेअरीमधून १८ लाखांचा दूध पावडर व अन्य ...

तासगाव, मांजर्डेत दूध डेअऱ्यांवर छापे
सांगली : अन्न व औषध प्रशासनाकडून तासगाव व मांजर्डे येथील दूध डेअरीमधून १८ लाखांचा दूध पावडर व अन्य साठा जप्त केला. गुरुवार पेठ, तासगाव येथील पवन मिल्क व मांजर्डे येथील अग्रणी मिल्क ॲण्ड ॲग्रो प्रोसेसिंग या डेअरीमध्ये ही कारवाई करण्यात आली.
यात भेसळीच्या संशयावरून गाय दूध, गायीचे शुद्ध तूप, गाय दूध व स्कीम्ड मिल्क पावडर जप्त करण्यात आली. या कारवाईमध्ये गाय दूध, पाश्चराइज्ड दुधाचा साठा नष्ट करण्यात आला. यात १८ लाखांचा साठा जप्त करण्यात आला.
बिऊर (ता. शिराळा) येथील किमलाईन डेअरी प्रोजेक्टवर छापा टाकून नमुना तपासणीसाठी घेऊन १८ हजार ८८६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.