तानंगमध्ये तीनपानी जुगार अड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:25 IST2020-12-24T04:25:26+5:302020-12-24T04:25:26+5:30

कुपवाड : तानंग (ता. मिरज) येथील तानंग फाट्यालगतच्या एका मोकळ्या जागेशेजारी असलेल्या भिंतीलगत सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्डयावर बुधवारी ...

Raid on three water gambling dens in Tanang | तानंगमध्ये तीनपानी जुगार अड्डयावर छापा

तानंगमध्ये तीनपानी जुगार अड्डयावर छापा

कुपवाड : तानंग (ता. मिरज) येथील तानंग फाट्यालगतच्या एका मोकळ्या जागेशेजारी असलेल्या भिंतीलगत सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्डयावर बुधवारी कुपवाड व मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्यावतीने छापा टाकून अकराजणांना अटक केली. या छाप्यात पोलिसांनी ६ लाख ७२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयितामध्ये महंमदअली शरीफुलहसन पटेल (वय ४०, रा. मिरज), चंद्रकांत आदिनाथ उपाध्ये (३५, रा. वखारभाग, सांगली), महेंद्र चौगोंडा कांबळे (४५, रा. कळंबी), रियाज शमशुद्दीन बेग (५०, रा. मिरज), अरुण विष्णू कांबळे (४५, रा. शिरोळ), अकबर बाबासाहेब लवगे (४४, रा. मिरज), जिनगोंडा बापू पाटील (६०, रा. कळंबी), दगडू विठ्ठल भोरे (६०, रा. कांचनपूर), आनंद विलास कवडे (४०, रा. मिरज), सज्जाद मन्सूर मोमीन (५०, रा. मिरज), मारुती नरसिंग बरगाले (७०, रा. मिरज) यांचा समावेश आहे.

तानंग फाट्यालगतच्या एका मोकळ्या जागेशेजारी असलेल्या भिंतीलगत बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तीनपानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती कुपवाड व मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाला समजली. त्यानुसार दोन्ही पोलीस ठाण्याच्या पथकाने या सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्डयावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांकडून अकरा संशयितावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच छाप्यात पोलिसांनी ६ लाख ७२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हवालदार एस. बी. गव्हाणे तपास करीत आहेत.

Web Title: Raid on three water gambling dens in Tanang