सांगलीत तीनपानी दोन जुगार अड्ड्यांवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:32+5:302021-09-02T04:56:32+5:30
सांगली : शहर परिसरातील राॅकेल लाईन व शिवाजी मंडई परिसरात चालणाऱ्या तीन पानी दोन जुगार अड्डयांवर शहर पोलिसांनी कारवाई ...

सांगलीत तीनपानी दोन जुगार अड्ड्यांवर छापा
सांगली : शहर परिसरातील राॅकेल लाईन व शिवाजी मंडई परिसरात चालणाऱ्या तीन पानी दोन जुगार अड्डयांवर शहर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी जुगार खेळणाऱ्या दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून १२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
बसस्थानक ते शिवाजी मंडई रस्त्यावरील सिटी पॅलेस हाॅटेलशेजारी असलेल्या स्टार लाँड्री दुकानाच्या इमारतीत तीन पानी जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला असता तिथे पाचजण तीनपानी जुगार खेळत असल्याचे मिळून आले. महादेव दादासाहेब खांडेकर (वय ४९, रा. अयोध्यानगर, मिरज), सुनील नाथा काळे (२५, रा. चिंतामणीनगर, सांगली), योगेश चंद्रकांत कांबळे (३५, रा. बेळंकी, ता. मिरज), दीपक सुरेश शिंदे (४२, रा. पाटणे प्लाॅट, सांगली), राकेश रसिकलाल शहा (५०, रा. भांडवले गल्ली, राम मंदिरजवळ, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ हजार ८८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
राॅकेल लाईन परिसरात आरवाडे चाळीच्या भितीलगतच पाचजण तीन पानी जुगार खेळत होते. यावेळी पोलिसांनी धनजंय दत्तात्रय चव्हाण (वय ३७, रा. नळभाग, वाघवाडी, सांगली), इम्तिया मौला जमादार (४८, रा. गोसावी गल्ली, सांगली), सोमनाथ नागेश गोंधळी (३०, रा. गोठणकर गल्ली, कुरुंदवाड), याकुब मकबुल शेख (५०, रा. जगदाळे प्लाॅट, सांगली), संतोष लक्ष्मण जावीर (२८, रा. हरिपूर रोड, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ६ हजार ९० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस काॅन्स्टेबल अभिजीत माळकर व नीलेश कदम यांनी केली.