सांगलीत जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:21 IST2020-12-07T04:21:04+5:302020-12-07T04:21:04+5:30

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करताना शहरातील तीनपानी जुगारअड्डा उद्ध्वस्त केला. रमामातानगर येथील आलिशान चौकात हा ...

Raid on Sangli gambling den | सांगलीत जुगार अड्ड्यावर छापा

सांगलीत जुगार अड्ड्यावर छापा

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करताना शहरातील तीनपानी जुगारअड्डा उद्ध्वस्त केला. रमामातानगर येथील आलिशान चौकात हा अड्डा सुरु होता. पथकाने शनिवारी रात्री ही कारवाई केली. यावेळी १३ जणांना अटक करत २६ हजार ३०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी समीर बाबू पैलवान, महंमद रफीक अब्दुलगणी काझी (दोघेही रा. मिरज), आयुब हुसेन पठाण, अभय श्रीनिवास कट्टी, संजय विलास शिंदे, अमित अशोक घबाडे, बशीर अल्लाबक्ष मुजावर, मोहन शामराव घाडगे ( सर्व रा. सांगली), विजय वसंत पाटील (सांगलीवाडी), जालिंदर गोविंद जाधव, अमानुल्ला उमरसोा खंडायत, मुसा चंदुलाल मुल्ला (तिघेही रा. जयसिंगपूर), संगाप्पा बापू औरसंग (इचलकरंजी) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

आलिशान चौक परिसरात तीनपानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून पत्ते व रोख २६ हजार ३०० रुपये जप्त करण्यात आले आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक अभिजित सावंत, जितू जाधव, सुभाष सूर्यवंशी, वैभव पाटील, सोहेल कार्तियानी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Raid on Sangli gambling den