धामणीजवळ जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:41+5:302021-05-31T04:20:41+5:30
सांगली : कोल्हापूर रोड ते धामणी रस्त्यावर सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांनी छापा टाकत उद्ध्वस्त केला. या कारवाईत तीनपानी ...

धामणीजवळ जुगार अड्ड्यावर छापा
सांगली : कोल्हापूर रोड ते धामणी रस्त्यावर सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांनी छापा टाकत उद्ध्वस्त केला. या कारवाईत तीनपानी जुगार खेळणाऱ्या पाचजणांना अटक करीत त्यांच्याकडून रोख ३३२० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कपिल गजानन पोतदार (वय ३२, रा. हरिपूर रोड), प्रज्योत दिलीप कोळी (२४, रा. पाण्याच्या टाकीजवळ, इनाम धामणी), सुरेश कलगोंडा पाटील (४८), चंद्रकांत अशोक कोळी (३५), बाहुबली महावीर हेर्ले (२६, रा. चौघेही इनामधामणी) अशी कारवाई झालेल्या संशयितांची नावे आहे.
शनिवारी (दि. २९) सायंकाळी धामणीजवळ एका ठिकाणी तीनपानी जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. पोलीस कर्मचारी महेश अरुण गुरव यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.