राहुल नाकील, जितेंद्र लादे यांची अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:33 IST2021-02-25T04:33:46+5:302021-02-25T04:33:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल नाकील यांची, तर इस्लामपूर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ...

Rahul Nakil, Jitendra Lade elected as President | राहुल नाकील, जितेंद्र लादे यांची अध्यक्षपदी निवड

राहुल नाकील, जितेंद्र लादे यांची अध्यक्षपदी निवड

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल नाकील यांची, तर इस्लामपूर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. जितेंद्र लादे यांची एकमताने निवड करण्यात आली.

इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निवडी करण्यात आल्या. मावळत्या अध्यक्षा डॉ. सीमा पोरवाल यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे देण्यात आली. डॉ. अतुल मोरे, डॉ. अनिल भोई, डॉ. एन.टी. घट्टे, डॉ. राहुल मोरे, डॉ. गोरख मंद्रुपकर, डॉ. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या.

इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी डॉ. अनिल माळी, सचिवपदी विकास पाटील, इस्लामपूर इंडियन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी डॉ. राम कुलकर्णी, सचिवपदी कृष्णा नलावडे, तर खजिनदारपदी डॉ. अमित पाटील यांची निवड करण्यात आली. डॉ. सोनल उमराणी यांनी आर्थिक ताळेबंद मांडला.

यावेळी डॉ. सुजाता डबाणे, डॉ. स्वाती पाटील, डॉ. रेखा माने, डॉ. दीपांजली पाटील, डॉ. संगीता मोरे, डॉ. उदयसिंह परदेशी उपस्थित होत्या.

Web Title: Rahul Nakil, Jitendra Lade elected as President