राहुल महाडिक भाजयुमोच्या सहकार विभागाचे प्रदेश संयोजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:27 IST2021-01-25T04:27:13+5:302021-01-25T04:27:13+5:30

इस्लामपूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या सहकार विभागाच्या प्रदेश संयोजक आणि सातारा जिल्ह्याचे पक्ष प्रभारी, अशा दोन पदांवर व्यंकटेश्वरा ...

Rahul Mahadik is the Regional Coordinator of BJP's Co-operation Department | राहुल महाडिक भाजयुमोच्या सहकार विभागाचे प्रदेश संयोजक

राहुल महाडिक भाजयुमोच्या सहकार विभागाचे प्रदेश संयोजक

इस्लामपूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या सहकार विभागाच्या प्रदेश संयोजक आणि सातारा जिल्ह्याचे पक्ष प्रभारी, अशा दोन पदांवर व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव राहुल महाडिक यांची निवड करण्यात आली.

मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवामोर्चा राज्य कार्यकारिणीचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ही निवड जाहीर केली.

राहुल महाडिक यांनी अल्पावधीत पक्षवाढीसाठी धडाकेबाज काम केले आहे. शिक्षण, समाजकारण, राजकारण, अशा वाटचालीनंतर त्यांनी सूतगिरणी आणि दूध संघाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे.

यावेळी प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, राहुल लोणीकर, प्रदेश सचिव जगन्नाथ पाटील, सचिव जयराज पाटील, प्रदेश सचिव प्रवीण फोंडे यांच्यासह कार्यकारिणीतील पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

फोटो : २३ इस्लामपूर २

ओळ : मुंबई येथे भाजप कार्यालयात विक्रांत पाटील यांनी राहुल महाडिक यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी सुशील मेंगडे, राहुल लोणीकर उपस्थित होते.

Web Title: Rahul Mahadik is the Regional Coordinator of BJP's Co-operation Department