नागाव येथे राहुल महाडिक यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:45+5:302020-12-13T04:40:45+5:30

इस्लामपूर : नागाव (ता. वाळवा) येथे ग्रामस्थांच्यावतीने राहुल महाडिक यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ...

Rahul Mahadik felicitated at Nagaon | नागाव येथे राहुल महाडिक यांचा सत्कार

नागाव येथे राहुल महाडिक यांचा सत्कार

इस्लामपूर : नागाव (ता. वाळवा) येथे ग्रामस्थांच्यावतीने राहुल महाडिक यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

राहुल महाडिक म्हणाले, नानासाहेब महाडिक व विलासराव शिंदे यांनी या भागामध्ये कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. त्यांना सर्वतोपरी मदत करू. या गावाशी महाडिक कुटुंबाची नाळ जोडलेली आहे. ती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न राहील. अनुभवी कार्यकर्ते व तरुणाई यांचा योग्य मेळ घालून पुढील वाटचाल करू.

राहुल महाडिक यांनी गावातील सर्व समस्यांचा पाहणी करून आढावा घेतला. त्या सोडविण्यासाठी योग्य उपाययोजना करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी उत्तम मगर, डॉ. राजेंद्र पाटील, भडकंबेचे रवींद्र पाटील, फार्णेवाडीचे उपसरपंच सागर सिद्ध, रणजित मगर, चेतन मगर, खाशाबा पाटील, नामदेव अडशिरे, शिवाजी मगर, गणेश मगर, सागर पाटील, विकास पाटील उपस्थित होते.

फोटो-१२इस्लामपुर३

फोटो- नागाव (ता. वाळवा) येथील सत्कार कार्यक्रमात राहुल महाडिक यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Rahul Mahadik felicitated at Nagaon