शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्याकडून आस्थेने विजयमाला कदम यांची विचारपूस, कदम-गांधी कुटुंबीयातील स्नेहबंधाला मिळाला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 16:57 IST

कडेगाव : वांगी ता. कडेगाव येथे डॉ.पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण व लोकतीर्थ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या विरोधी पक्षनेते ...

कडेगाव : वांगी ता. कडेगाव येथे डॉ.पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण व लोकतीर्थ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या पत्नी व डॉ.विश्वजित कदम यांच्या आई  विजयमाला कदम यांची गळाभेट घेतली. आस्थेने विचारपूस केली. यानिमित्ताने कदम आणि गांधी कुटुंबीयातील स्नेहबंधाला उजाळा मिळाला.लोकतीर्थ परिसरात वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी राहुल गांधी निघाले होते. यावेळी विजयमाला कदम व त्यांची भेट झाली. त्यांना नमस्कार करून "कशा आहात?  काळजी घ्या असे म्हणत त्यांची गळाभेट घेतली. यावेळी विजयमाला कदम यांच्या समवेत त्यांच्या कन्या डॉ.अस्मिता जगताप व स्नुषा स्वप्नाली कदम  या उपस्थित होत्या. यावेळी स्मारकस्थळी भारती विद्यापीठाचे कुलपती  डॉ. शिवाजीराव कदम, सोनहीराचे संचालक राघुनाथराव कदम, जयसिंगराव कदम, डॉ.हणमंतराव कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, भारती लाड , शांताराम कदम, वैशालीताई कदम, पुण्याचे नगरसेवक रामचंद्र कदम, विजयसिंह कदम, सुरेश कदम, डॉ.जितेश कदम, दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम, सोनहीराचे कार्यकारी संचालक शरद कदम यांचेसह सर्व कदम कुटुंबीय उपस्थित होते.मोहनराव कदम यांच्याशी संवाद लोकतीर्थ या स्मारकस्थळी आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी कुटुंबातील जेष्ठ सदस्य माजी आमदार मोहनराव कदम यांची ओळख करून दिली.यावेळी राहुल गांधी यांनी  आमदार मोहनराव कदम यांना नमस्कार करून संवाद साधला. डॉ.पतंगराव कदम यांचे बरोबर आमदार मोहनराव कदम यांनीही तब्बल ६० वर्षे एकनिष्ठ राहून केलेल्या कामाचे कौतुक केले व डॉ.पतंगराव कदम पुतळा अनावरण प्रसंगी फोटो काढताना  मोहनराव कदम यांना स्वतः  जवळ बोलवून घेतले. 

टॅग्स :SangliसांगलीRahul Gandhiराहुल गांधीVishwajeet Kadamविश्वजीत कदम