शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 11:34 IST

यावर्षी मान्सून पाऊस वेळेत झाला नसल्यामुळे खरीप हंगामाच्या शंभर टक्के पेरण्या झाल्या नाहीत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या, तेथील पिके परतीच्या मुसळधार पावसामुळे कुजू लागली आहेत. अनेक जमिनीत पाणी साचून राहिल्यामुळे रब्बी पेरणीसाठी जमिनी तयार करण्यासाठी वाफसाच नसल्यामुळे रब्बी पेरणीही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबणीवर हंगामासाठी शेत तयार करणार कसे, असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न

सांगली : यावर्षी मान्सून पाऊस वेळेत झाला नसल्यामुळे खरीप हंगामाच्या शंभर टक्के पेरण्या झाल्या नाहीत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या, तेथील पिके परतीच्या मुसळधार पावसामुळे कुजू लागली आहेत. अनेक जमिनीत पाणी साचून राहिल्यामुळे रब्बी पेरणीसाठी जमिनी तयार करण्यासाठी वाफसाच नसल्यामुळे रब्बी पेरणीही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच खरीप हंगामातील तयार झालेली पिके काढण्यास पावसामुळे अडथळा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम रब्बी हंगामाची पेरणीवर झाला आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर पडण्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.यावर्षी रब्बी हंगामातील पेरणी आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आजमितीस ज्वारी व हरभरा पेरणीला सुरुवात होणे आवश्यक होते. गव्हाची पेरणी थोडी उशिराने केली तरी चालणार आहे. या पिकांच्या पेरण्यांसाठी आधी शेत तयार करावे लागणार असून, त्यासाठी खरिपाची पिके काढणे आवश्यक आहे.प्रत्यक्षात मात्र हीच पिके शेतात उभी असल्याने रब्बी हंगामासाठी शेत तयार करणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. जोपर्यंत वाफसा तयार होत नाही, तोपर्यंत पेरणी करता येणार नाही. येत्या दहा दिवसांमध्ये चांगल्या प्रमाणात ऊन पडले तर वाफसा होणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली