शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: श्रेयवादाची जुगलबंदी ठरणार नव्या राजकीय संघर्षाची नांदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 16:42 IST

आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर मतदारसंघातील राजकारण अनेक नावीन्यपूर्ण वळणे घेत पुन्हा संघर्षाच्या वळणावर आले

दत्ता पाटीलतासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या सत्तानाट्यानंतर कवठेमहांकाळ पाणी योजनेच्या श्रेयवादाचा नारळ फुटला. तेव्हापासून सुरू झालेली श्रेयवादाची चढाओढ तासगाव पंचायत समिती इमारत बांधकामाच्या निधी मंजुरीपर्यंत येऊन ठेपली आहे. भाजप, राष्ट्रवादीच्या श्रेयवादाचा संघर्ष राष्ट्रवादीचे रोहित पाटील आणि भाजपचे प्रभाकर पाटील या युवा नेत्यांनी चांगलाच मनावर घेतला आहे. या श्रेयवादाच्या जुगलबंदीने राजकीय संघर्षाची नांदी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने मतदारसंघात युवा नेत्यांच्या संघर्षाचा नवा अध्याय पाहिला मिळत आहे.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील व खासदार संजय पाटील यांच्या गटातील जुन्या संघर्षाची नव्याने सुरुवात कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीनंतर झाली तेव्हापासून आजअखेर हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे.कवठेमहांकाळचे नगराध्यक्षपद ताब्यात घेताच, शासनाने मंजूर केलेली पाणी योजना आमच्याच प्रयत्नातून झाल्याचा दावा खासदार गटाने केला. तर या पाणी योजनेचा प्रस्ताव देऊन पाठपुरावा केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला तेव्हापासून मतदार संघात येणाऱ्या प्रत्येक निधीवर दोन्ही गटांतील नेते दावा करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयवादाचा कांगावा सुरू आहे.सहा महिन्यांपूर्वी पंचायत समितीला १५ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर झाला. मात्र राज्यातील सरकार बदलल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांनी जुन्या सरकारमधील सर्वच कामांना स्थगिती दिली. त्याचवेळी पंचायत समितीच्या निधीसही स्थगिती मिळाली. ही स्थगिती नुकतीच शासनाकडून शासनाकडून उठवण्यात आली. यावरून समाजमाध्यमांवर श्रेयवाद सुरू झाला. भाजपचे नेते प्रभाकर पाटील यांनी पुराव्यांसह हे आमचेच श्रेय असल्याचे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही पुराव्यांसह भूमिका मांडली. या श्रेयवादाने भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतःचे स्वतःच समाधान करून घेतले असले तरी सामान्य जनतेला नेमके काम कोणाचे आहे, याचे वास्तव माहीत आहे. मुळातच श्रेयवादाचा आटापिटा कशासाठी? असाच प्रश्न आहे.पब्लिक सब जानती है...! आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर मतदारसंघातील राजकारण अनेक नावीन्यपूर्ण वळणे घेत पुन्हा संघर्षाच्या वळणावर आले आहे. दरम्यानच्या काळात तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघांतील सर्वच नेत्यांनी संधिसाधू आणि सोयीस्कर भूमिका घेत राजकारण केले. पुन्हा संघर्षाच्या वळणावर आल्यानंतर अनेक वर्षांपासून विकासाचा गाजावाजा पुन्हा सुरू झाला.  त्यासाठी श्रेयवादाचा आट्टापट्टा चाललेला आहे. मात्र, ये पब्लिक है, सब जानती है...!’, अशीच भावना जनतेची आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण