आर. डी. पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST2021-08-26T04:29:28+5:302021-08-26T04:29:28+5:30
इस्लामपूर : शहरातील लाल चौक परिसरातील ज्येष्ठ नागरिक व प्रथितयश महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष रामचंद्र दाजी तथा आर. ...

आर. डी. पाटील यांचे निधन
इस्लामपूर : शहरातील लाल चौक परिसरातील ज्येष्ठ नागरिक व प्रथितयश महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष रामचंद्र दाजी तथा आर. डी. पाटील-ओझर्डेकर (वय ९८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
रामचंद्र पाटील यांनी बीए, बीटीडी ही पदवी प्राप्त केल्यावर रयतमध्ये शिक्षकी पेशाला सुरुवात केली. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने १९५४ साली महात्मा फुले शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी या संस्थेतील शाळांमध्ये विनावेतन अध्यापनाचे काम केले. महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षण संस्थेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. प्रा. डॉ. एन. डी. पाटील व संस्थेच्या सचिव सरोजमाई पाटील यांचे विश्वासू निकटवर्तीय म्हणून पाटील यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा प्रदीर्घकाळ सांभाळली. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अभियंता संजय पाटील, सुनील पाटील व मुख्याध्यापक अनिल पाटील यांचे ते वडील होत.