पदवीधरांचे प्रश्न निकाली निघतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST2020-12-16T04:41:10+5:302020-12-16T04:41:10+5:30

शिगाव (ता. वाळवा) येथे पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद लाड, किरण लाड, शिवसेना ...

The questions of the graduates will be settled | पदवीधरांचे प्रश्न निकाली निघतील

पदवीधरांचे प्रश्न निकाली निघतील

शिगाव (ता. वाळवा) येथे पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद लाड, किरण लाड, शिवसेना शाखाप्रमुख आनंदराव सावंत प्रमुख उपस्थित होते.

प्रा. भूषण भासर व आनंदराव सावंत यांच्याहस्ते लाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. भासर म्हणाले, शिक्षक व पदवीधरांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. येत्या काही काळात हे सर्व प्रश्न हळूहळू निकाली निघतील. पदवीधर व शिक्षक यांना नक्की न्याय मिळेल.

अरुण लाड म्हणाले, मागील काळात पदवीधरांचा अपेक्षाभंग झाला आहे. पण यापुढे असे होणार नाही. प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. मला पदवीधरांनी दिलेली ही मोठी संधी आहे, याचे नक्कीच सोने करून दाखवू.

यावेळी शिक्षक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

फाेटाे : १५ शिगाव १

ओळ :

शिगाव (ता. वाळवा) येथे आमदार अरुण लाड यांचा सत्कार प्रा. भूषण भासर व आनंदराव सावंत यांनी केला.

Web Title: The questions of the graduates will be settled