आरळा येथे शासकीय कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:30 IST2021-01-08T05:30:08+5:302021-01-08T05:30:08+5:30

शनिवार, दि. २ रोजी आरळा येथील आठवडा बाजारामध्ये व्यापाऱ्यांकडून ग्रामपंचायत कर्मचारी मारुती तुपारे, निवृत्ती तुपारे हे कर ...

Pushback to a government employee at Arla | आरळा येथे शासकीय कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

आरळा येथे शासकीय कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

शनिवार, दि. २ रोजी आरळा येथील आठवडा बाजारामध्ये व्यापाऱ्यांकडून ग्रामपंचायत कर्मचारी मारुती तुपारे, निवृत्ती तुपारे हे कर वसूल करत होते. यावेळी काही व्यापाऱ्यांनी आम्ही तुमच्या गावातील संजय नथुराम सूर्यवंशी यांच्याकडे कराचे पैसे दिले आहेत, असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट ग्रामसेवक प्रवीण कांबळे यांना सांगितली. कांबळे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संजय सूर्यवंशी याला याबाबत जाब विचारला असता, सूर्यवंशी याने मी कर गोळा करणार आहे. तुमची काय गरज नाही, अशी अरेरावीची भाषा करत धमकी देऊन मारुती तुपारे यांच्या हातातील कर पावती बुक हिसकावून घेतले व फाडून टाकले. धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करत आहेत.

Web Title: Pushback to a government employee at Arla