महासभेचा ठराव डावलून स्थायी समितीत वाहन खरेदीचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:50+5:302021-08-27T04:29:50+5:30

सांगली : महापालिकेच्या सभेत घनकचरा व्यवस्थापनासाठी वाहन खरेदीचा ठराव करण्यात आला; पण या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता लावत स्थायी समितीकडून ...

The purchase of a vehicle in the Standing Committee by defying the resolution of the General Assembly | महासभेचा ठराव डावलून स्थायी समितीत वाहन खरेदीचा घाट

महासभेचा ठराव डावलून स्थायी समितीत वाहन खरेदीचा घाट

सांगली : महापालिकेच्या सभेत घनकचरा व्यवस्थापनासाठी वाहन खरेदीचा ठराव करण्यात आला; पण या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता लावत स्थायी समितीकडून अकरा कोटींच्या वाहन खरेदीचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे या प्रस्तावाला सभेत विरोध होण्याची शक्यता आहे. त्यातच काहींनी मध्यस्थी करीत हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठीही प्रयत्न चालविले आहेत.

स्थायी समितीची शुक्रवारी सभा होत आहे. या सभेत घनकचरा व्यवस्थापनासाठी १४ व्या वित्त आयोगातून १३ कोटी रुपयांची वाहनखरेदीचा विषय आहे. डिसेंबर २०२०च्या महासभेत वाहन खरेदीवर चर्चा झाली होती. त्या ठरावात ११ कोटी ४० लाख रुपयांच्या १० प्रकारची वाहन खरेदीला मंजुरी देण्यात आली. या ठरावाच्या अनुषंगानेच स्थायी समितीसमोर खरेदीचा प्रस्ताव आला आहे. पण त्यात विसंगती दिसून येत आहे.

महासभेने रिक्षा घंटागाडी खरेदीबाबत कोणताही ठराव केलेला नाही. पण स्थायी समितीसमोर ४८ रिक्षा घंटागाडी खरेदीचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. महासभेने दोन काॅम्पॅक्टर, चार लोडर, ४ डम्पर प्लेसर खरेदीला मान्यता दिली आहे, तर स्थायीत या तीन प्रकाराची प्रत्येकी सात वाहने खरेदीचे विषयपत्र आले आहे. त्यामुळे महासभेचा ठराव व स्थायी समितीसमोर आलेला प्रस्तावात मोठी तफावत आहे. आता महासभेचा ठराव डावलून वाहनखरेदीचा निर्णय होणार का, याकडे लक्ष लागले आहे. त्यातच काहीजणांनी प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न चालविले आहेत. पण रात्री उशिरापर्यंत बोलणी यशस्वी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The purchase of a vehicle in the Standing Committee by defying the resolution of the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.