विट्यात नवीन ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST2021-04-23T04:28:39+5:302021-04-23T04:28:39+5:30

विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोविड सेंटरमध्ये बेडची उपलब्धता आणि ऑक्सिजन पुरवठा अडचणीत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ...

Purchase of new Dura Oxygen Cylinder in Vita | विट्यात नवीन ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी

विट्यात नवीन ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी

विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोविड सेंटरमध्ये बेडची उपलब्धता आणि ऑक्सिजन पुरवठा अडचणीत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खासगी कोविड सेंटरच्या मागणीनुसार पाच नवीन ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी केली आहे. हे सिलिंडर गुरुवारी नाशिकच्या सिन्नर येथून विट्याकडे रवाना झाले आहेत.

सध्या खानापूर तालुक्यात सहा कोविड रुग्णालये आहेत. त्यात शासकीय २, निमशासकीय १ व खासगी ३ रुग्णालयांचा समावेश आहे. विटा व भिवघाट ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी २५, नगरपालिकेच्या कोविड सेंटरला ३८, सद्गुरू हॉस्पिटल येथे ३०, श्री हॉस्पिटलला २६, ओमश्रीमध्ये ४५ अशा एकूण १८९ ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आली आहे. आता नव्याने खानापूर येथील डॉ. हजारे यांचे हॉस्पिटल कोविड सेंटर करण्यात येणार आहे. या कोविड सेंटरला ऑक्सिजनसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

खासगी कोविड सेंटरच्या मागणीनुसार प्रशासनाने पाच नवीन ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले आहेत. नाशिकच्या सिन्नर येथील कंपनीकडून ते खरेदी करण्यात आले असून रवाना झाले आहेत. कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: Purchase of new Dura Oxygen Cylinder in Vita