चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:20 IST2021-06-01T04:20:33+5:302021-06-01T04:20:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : चौंडी (जि. अहमदनगर) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र धनगर समाज ...

Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti celebrations at Choundi | चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : चौंडी (जि. अहमदनगर) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. चिमण डांगे यांनी अभिषेक व पूजन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष शंभूशाहीर प्रा. अरुण घोडके, मल्हार सेनेचे सुनील मलगुंडे, चौंडी गावचे सरपंच सुनील उबाळे, उपसरपंच कल्याणराव शिंदे, गणेश उबाळे, अविनाश शिंदे, अक्षय शिंदे उपस्थित होते.

दरम्यान, धनगर समाज महासंघाचे संस्थापक आणि चौंडी विकास प्राधिकरणाचे प्रणेते अण्णासाहेब डांगे यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर येथील आपल्या निवासस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. तसेच दीनदयाळ सूतगिरणीत संचालक राजेंद्र लोंढे आणि मंगेश लवटे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सरव्यवस्थापक विनोद देशमुख, आर. एस. मिरजे, बजरंग कदम उपस्थित होते.

Web Title: Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti celebrations at Choundi