शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: आगामी निवडणुकीत जरांगे फॅक्टरचे दर्शन घडणार, इस्लामपुरात तिरंगी लढतीची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:13 IST

नगराध्यक्षपदाचे दावेदार वाढले 

अशोक पाटीलइस्लामपूर : विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इस्लामपूरमध्ये नव्याने एंट्री झाली होती आणि पालिका निवडणुकीतही अजित पवार गट सक्रिय झाला आहे. आता पंजाबराव पवार यांनी मनोज जरांगे यांचे नेतृत्व मानून नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत जरांगे फॅक्टरचे दर्शनही घडणार आहे.पंजाबराव पवार यांनी अलीकडील काळात मनोज जरांगे यांचे नेतृत्व मानून सक्रिय राहणे पसंत केले आहे. नगरपालिकेच्या राजकारणात शहर सुधार समिती स्थापन करण्यात ते पुढे होते. त्यांनी पालिका निवडणूकही लढविली आहे. आता जरांगे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासाठी पंजाबराव पवार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे येथे तिंरगी लढत होण्याची शक्यता आहे.पालिका निवडणुकीच्या रणांगणात आमदार जयंत पाटील यांचा एकमेव गट आहे. त्यांच्या विरोधात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि आता जरांगे फॅक्टर पालिकेच्या राजकारणात आला आहे. जयंत पाटील यांच्या विरोधी असलेल्या गटात अंतर्गत संघर्ष आहे. त्यातच आता जरांगे फॅक्टरचे नाणे चालणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.यापूर्वी शहरात मनोज जरांगे यांचे नेतृत्व मानणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळेच मनोज जरांगे फॅक्टरसाठी पंजाबराव पवार यांनी पालिकेच्या राजकारणात उतरण्याची तयारी केली आहे. आता पवार थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार असून, लवकरच जरांगे यांच्या गावी जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

कोणत्याही परिस्थितीत मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केला जाईल. पालिका निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालणार यात तिळमात्र शंका नाही. तरीही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. -पंजाबराव पवार, इस्लामपूर

English
हिंदी सारांश
Web Title : Jarange Factor Looms Over Sangli Politics, Islampur Faces Three-Way Fight

Web Summary : Islampur's municipal election anticipates a three-way contest. Punjabrao Pawar, embracing Manoj Jarange's leadership, prepares to contest for the mayoral position. This introduces the 'Jarange factor' against established groups, potentially reshaping local politics. Pawar plans to seek Jarange's guidance.