अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST2021-03-07T04:23:59+5:302021-03-07T04:23:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास न्यायालयाने तीन वर्षांची सश्रम ...

Punishment of three years for molesting a minor girl | अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास न्यायालयाने तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अनिल मधुकर डोंबाळे (वय २२, रा. मौजे डिग्रज) असे आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रियाज जमादार यांनी काम पाहिले.

खटल्याची माहिती अशी की, २५ ऑगस्ट २०१८ रोजी मौजे डिग्रज येथे पीडित मुलगी जनावरांना वैरण घालण्यासाठी गोठ्याकडे सायकलवरून तिच्या मामाच्या मुलासोबत जात होती. यावेळी आराेपीने दुचाकी आडवी मारत, उतरत मुलीचा हात पकडला व तिच्याशी अश्लील शब्द वापरून गोठ्याकडे ओढून नेत होता. यावेळी मुलीने आरडाओरडा केल्याने शेजारील लोक आले असता, आरोपी डोंबाळे हा पळून गेला. या प्रकरणाचा सखोल तपास करून ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित मुलगी व तिच्या मामाचा मुलगा यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

Web Title: Punishment of three years for molesting a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.