तासगाव एसटी आगाराच्या कारभाराचा फलकावर पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST2020-12-12T04:42:54+5:302020-12-12T04:42:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : तासगाव एसटी आगारातील काही अधिकाऱ्यांकडून मनमानी करून चालक, वाहकांना त्रास दिला जात आहे. आगाराचेही ...

Punchnama on the management board of Tasgaon ST depot | तासगाव एसटी आगाराच्या कारभाराचा फलकावर पंचनामा

तासगाव एसटी आगाराच्या कारभाराचा फलकावर पंचनामा

लोकमत न्यूज नेटवर्क

तासगाव : तासगाव एसटी आगारातील काही अधिकाऱ्यांकडून मनमानी करून चालक, वाहकांना त्रास दिला जात आहे. आगाराचेही आर्थिक नुकसान झाले आहे. या कारभाराबाबत एसटी कामगार सेनेकडून बसस्थानकातील फलकावर रोज एक समस्या लिहून चुकीच्या कारभाराचा पंचनामा केला जात आहे. दोषी असणाऱ्यांंवर कारवाई करण्याबाबत उपमहाव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे.

एसटी महामंडळाच्या तासगाव आगारात चालक, वाहकांचा विचार न करता, आगाराच्या फायद्याचा विचार न करता चुकीच्या पध्दतीने कारभार सुरू आहे. विभाग नियंत्रकांच्या पत्राची दखल न घेता, कामगारांच्या ज्येष्ठतेप्रमाणे कामगिरी न देता चुकीचे शेरे मारण्यात आले आहेत. वाहतूक निरीक्षकांनी चुकीच्या पध्दतीने शेरे नोंद करून, चुकीचे कामकाज चालवून महामंडळाचे नुकसान केले आहे. १४ कर्मचाऱ्यांना चुकीचे शेरे मारून महामंडळाचे ३३ हजार ९०२ रुपयांचे नुकसान केले आहे.

महामंडळाचे आर्थिक नुकसान करण्याबरोबरच तासगाव आगारातील अधिकाऱ्यांकडून सुरू असणाऱ्या मनमानी कारभाराबाबत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून फलकावर रोज एक समस्या मांडून कारभाराचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. मनमानीविरोधात कामगार सेनेकडून उपमहाव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले असून, कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Punchnama on the management board of Tasgaon ST depot