कामेरीत ‘मॉडेल स्कूल’साठी लोकसहभाग हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST2021-02-06T04:48:15+5:302021-02-06T04:48:15+5:30
कामेरी : कामेरी येथील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांची मॉडेल स्कूल योजनेत निवड झाली आहे. या शाळांना आवश्यक त्या ...

कामेरीत ‘मॉडेल स्कूल’साठी लोकसहभाग हवा
कामेरी : कामेरी येथील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांची मॉडेल स्कूल योजनेत निवड झाली आहे. या शाळांना आवश्यक त्या शैक्षणिक, भाैतिक व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २ कोटींपेक्षा जास्त निधी लागणार आहे. हा निधी शासनाच्या विविध योजना व लोकवर्गणीतून उपलब्ध केला जाणार आहे. यासाठी कामेरी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले.
कामेरी (ता. वाळवा) येथे जिल्हा परिषद शाळेत मॉडेल स्कूल योजना राबविण्याबाबत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत प्रशासनाला नियोजित आराखडा तयार करण्याच्या सूचना ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार यांना दिल्या असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
कामेरी शाळा उत्कृष्ट मॉडेल स्कूल म्हणून नावारूपाला आणून गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन सरपंच स्वप्नाली जाधव यांनी केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, विस्तार अधिकारी छाया माळी, उपसरपंच केशव पाटील, ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार, सचिन जाधव, सिंधूताई पाटील, सुनीता अष्टेकर, ग्रा.प. सदस्य योगेश पाटील, किरण नांगरे उपस्थित होते .
फोटो ओळी- ०४०२२०२१-कामेरी १
मॉडेल स्कूलसाठी कामेरी जि.प. शाळेची इमारत रंगरंगोटी व बोलक्या भिंती उपक्रमाने सज्ज
फोटो ओळी- ०४०२२०२१-कामेरी २
कामेरी जि.प. शाळेत गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी यावेळी सरपंच स्वप्नाली जाधव, उपसरपंच केशव पाटील, ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार, सचिन जाधव, योगेश पाटील, किरण नांगरे उपस्थित होते.